कोल्हापूर दि. ३० : सोल्जर टेक्नीकल पदासाठी पोलीस ट्रेनिंग ग्राऊंड, बीड येथे दि. १३ फेब्रुवारी २०१२ रोजी पहाटे ५-३० वाजता लातूर, उस्मानाबाद, बीड, अहमदनगर आणि पुणे जिल्हे सोडून सैन्य भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे- शैक्षणिक प्रमाणपत्र (बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्कशीट), तहसिलदार/प्रांत/जिल्हाधिकारीᅠयांच्या सही शिक्क्यासह अधिवासी प्रमाणपत्र, सरपंच, एसएचओ, पोलीस स्टेशन, जेथे शिक्षण घेत असेल त्या शाळा / कॉलेजचे प्राचार्य यांचे सहा महिन्याच्या आतील चारित्र्याचा दाखला असावा. १० रंगीत पासपोर्ट साईज छायाचित्रे, संगणकावर काढलेली छायाचित्रे चालणार नाहीत. प्रांत/उपजिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या सही शिक्क्यासह जातीचा दाखला, आवश्यक असेल त्यांना मृत्यूचा दाखला. २१ वर्षाखालील उमेदवारांसाठी दहा रुपयांच्या स्टँप पेपरवर सरपंच किंवा नोटरी यांच्या सही शिक्क्यासह अविवाहीत असल्याबाबतचा दाखला.
इच्छुक उमेदवारांनी पोलीस ट्रेनिंग ग्राऊंड, बीड येथे भरतीसाठी वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, कोल्हापूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.