कोल्हापूर दि. ८ : हातकणंगले तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक चालू असल्याने या कालावधीत गंभीर स्वरुपाचा गुन्हा होऊन सार्वजनिक शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून फौजदारी संहिता कलम १४४ (२) नुसार हातकणंगले तालुक्याचे कार्यकारी दंडाधिकारी समीर शिंगटे यांनी २९ जणांना हातकणंगले तालुक्याच्या हद्दीत दि. १ फेब्रुवारी २०१२ ते दि. ९ फेब्रुवारी २०१२ पर्यंत मतदानाचा दिवस ७ फेब्रुवारी २०१२ वगळता प्रवेश करण्यास मनाई केली आहे.
हातकणंगले तालुका हद्दीत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आलेल्या दखलपात्र गुन्हे दाखल असलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. निशांत अशोक एकांडे, बाळासाहेब कृष्णा निकम, चनाप्पा नचलु नेहरे, संजय देवगौंडा आवटे, संजय पांडुरंग बानदार, बाजीराव पांडुरंग बानदार, पोपट पांडुरंग बाणदार, शितल महादेव जाधव, राजेंद्ग सुरवशे, किसण शामराव तिरपणकर, निलेश बाळासाो कागले, गोगा ऊर्फ कृष्णात नरहरी बाणदार, अरुण दादासाो तिरपणकर, राजु मुरारी लंगु, सुकुमार सर्जेराव भोमान्ना, बिरदेर धुळा डावरे, बाळु नवलु नेहरे, नारायण धोंडीबा रामान्ना, धुळा यमाजी ढबु, गंगाराम बापु भोमान्ना, प्रकाश सत्तुजी पुजारी, परशुमार यशवंत डावरे, संजय ऊर्फ धुळा मुरारी लंगु, रामा बापू कुशाप्पा, धुळा धोंडीबा रामान्ना, राजु धुळा पुजारी, मुरारी यमाजी ढबु, रायगोंडा बापु डावरे, विलास भुपाल नेहरे.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.