कोल्हापूर दि. ३ : त्रिपुराचे राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील दि. ५ फेब्रुवारी २०१२ रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्यावर येत असून त्यांच्या दौर्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार दि. ५ फेब्रुवारी २०१२ रोजी सकाळी ११ वाजल्यानंतर सांगलीहून मोटारीने कोल्हापुरकडे प्रयाण व मुक्काम.
सोमवार दि. ६ फेब्रुवारी २०१२ रोजी घरगुती स्थानिक कार्यक्रमांना उपस्थिती.
मंगळवार दि. ७ फेब्रुवारी २०१२ रोजी कोल्हापुरहून मोटारीने चिकोडी, जि. बेळगांवकडे प्रयाण व प्रकाश हुक्कीरे यांच्या कार्यक्रमास उपस्थिती. नंतर चिकोडीहून मोटारीने कोल्हापूरकडे प्रयाण.
बुधवार दि. ८ फेब्रुवारी २०१२ रोजी उदय शिक्षण संस्थेचे संत शांती प्रकाश हायस्कूलच्या कार्यक्रमास उपस्थिती. रात्री ८-३० वा. कोल्हापुरहून महालक्ष्मी एक्सप्रेसने पुण्याकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम राहील.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.