कोल्हापूर दि. ७ : ग्रामविकास मंत्री जयंत पाटील ८ एप्रिल २०१२ रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार दि. ८ एप्रिल २०१२ रोजी बेळगांवहून सायं. ४-३० वाजता कोवाड, ता. चंदगड येथे आगमन व पद्मश्री कै. रणजित देसाई यांच्या स्मारकास व संबंधित ठिकाणांना भेटी. ६-३० वाजता श्रीराम विद्यालय प्रांगण, रणजित नगर, कोवाड येथे पद्मश्री कै. रणजित देसाई सार्वजनिक ग्रंथालयाच्या दशकपुर्ती व ८५ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. रात्रौ ८-३० वाजता मोटारीने बेळगांवकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.