** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, April 4, 2012

त्रिपुराचे राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचा कोल्हापूर दौरा कार्यक्रम

            कोल्हापूर दि. ४ : त्रिपुराचे राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील शनिवार दि. ७ एप्रिल २०१२ रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असून त्यांच्या दौर्‍याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार दि. ७ एप्रिल २०१२ रोजी मुंबईहून सकाळी ७-२० वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथे आगमन व कसबा बावडा, कोल्हापूर निवासस्थानाकडे प्रयाण व आगमन. दुपारी आनंदराव पाटील चुयेकर यांच्या कार्यक्रमास उपस्थिती.
दि. ८ व ९ एप्रिल रोजी स्थानिक कार्यक्रमांना उपस्थिती.
दि. १० एप्रिल रोजी रात्रौ ८-३० वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.