कोल्हापूर दि. ७ : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. आयोगाचे सदस्य डॉ. प्रा. नागोराव कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस सदस्य सर्वश्री प्रा. जवाहर चरडे, प्रा. न. मा. जोशी, हाजी शौकतभाई तांबोळी, कैलास गौड आणि अॅड. पल्लवी रेणके उपस्थित होते.
प्रथम आयोगाचे सदस्य सचिव दिलीप स्वामी यांनी सर्व सदस्यांचे स्वागत केले. आयोगाचे अध्यक्ष न्या. बी. पी. सराफ हे बैठकीस उपस्थित राहू न शकल्याने प्रा. नागोराव कुंभार यांनी बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविले. बैठकीत विविध विषयावर चर्चा झाली.
बैठकीच्या अखेरीस प्रा. कुंभार यांनी विविध जातींच्या मागण्यांची निवेदने स्वीकारली. बैठकीस विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी विजयकुमार गायकवाड आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.