कोल्हापूर, दि.
23 (जिमाका) : लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म दिन "सामाजिक
न्याय दिन" म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
यादिवशी सोमवार दिनांक 26 जून 2023 रोजी सकाळी 8.30 वाजता, दसरा चौक, कोल्हापूर
येथे जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज
यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येवून समता दिंडीची सुरुवात होईल.
या निमित्त कोल्हापूरत होणाऱ्या समता दिंडीचा मार्ग दसरा
चौक- व्हिनस कॉर्नर-माई महाराजांचा पुतळा- बिंदू चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक - छत्रपती
प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय समोरुन- दसरा चौक येथे समारोप होईल.
समता दिंडीचे नियोजन प्रभावीपणे पार पाडण्यासाठी जिल्हा
प्रशासनातील विविध विभागा सहभागी होत आहेत. विविध शाळा महाविद्यालय मधील विद्यार्थी,
नागरिक सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी सर्व शासकीय कार्यालयांमधील अधिकारी/कर्मचारी
यात सहभागी होणार आहेत. बारा बलुतेदारांच्या पारंपरिक वेशभूषेत साधारणपणे शंभर विद्यार्थी
सहभागी होणार आहेत. जिल्ह्यामधील विविध खेळाडू, एनसीसी, एनएसएस विद्यार्थी देखील उपस्थित
राहणार आहेत. संवैधानिक मूल्य आणि महामानवांच्या विचारांचा जागर या दिंडीमध्ये होईल,
अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त
विशाल लोढे यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.