** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, June 9, 2023

धोकादायक उद्योगात किशोरवयीन कामगार आढळल्यास सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधा - सहाय्यक कामगार आयुक्त वि.वि. घोडके

 


कोल्हापूर, दि. 9 (जिमाका):  कोणत्याही व्यवसायात 14 वर्षाखालील बालक काम करताना अढळल्यास अथवा धोकादायक उद्योग व प्रक्रिया करणा-या संस्थामध्ये 18 वर्षाखालील किशोरवयीन कामगार कामावर  ठेवल्याचे निदर्शनास आल्यास सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त वि.वि. घोडके यांनी केले आहे.

जिल्ह्यातील सर्व आस्थापना, दुकाने, कारखाने व अन्य व्यावसायिकांनी बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, 2016 नुसार 14 वर्षाखालील बालकांना कामावर ठेवणे तसेच 14 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलांना धोकादायक उद्योग व प्रक्रियामध्ये कामावर ठेवणे हा गुन्हा आहे. मालकाने, नियोक्त्याने बालक अथवा किशोरवयीन मुलास कामावर ठेवल्यास त्यांना 20 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत दंड अथवा 6 महिने ते 2 वर्षांपर्यंत कारावास होवू शकतो किंवा दोन्हीही शिक्षा होवू शकतात, असेही श्री. घोडके यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

कार्यालयाचा पत्ता : सहाय्यक कामगार आयुक्त, कोल्हापूर

597, ई, व्यापारी पेठ, शाहुपुरी, कोल्हापूर

दूरध्वनी क्रमांक : 0231-2653714

ई-मेल आयडी- aclkolhapur@gmail.com

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.