कोल्हापूर, दि. 19 (जि.मा.का.) : मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र कोल्हापूर
प्रक्षेत्रावर गिरीराज पक्षी संगोपनाचा कार्यक्रम सुरू आहे. गिरीराज पक्षी
पशुवैद्यकीय महाविद्यालय बंगलोर यांच्याकडून खरेदी केलेले असून या पक्षापासून उत्पादित
होणारी अंडी विक्री करावयाची आहेत. यासाठी इच्छुकांनी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन,
मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, ताराबाई पार्क कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असे
आवाहन मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्राचे सहाय्यक आयुक्त ए. एस. इंगळे यांनी केले
आहे.
मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र कोल्हापूर
प्रक्षेत्रावर उत्पादित होणाऱ्या उकडून खाण्यासाठी अंडी विक्रीचा दर पुढीलप्रमाणे
आहे. दि. 1 मार्च 2023 ते 30 जून 2023 पर्यंत 4 रूपये प्रति अंडे व दि. 1 जुलै 2023 ते 28 फेब्रुवारी 2024 पर्यंत 7
रूपये प्रति अंडे असा आहे. अधिक माहितीसाठी 0231-2651729/ 8624030358/ 9130055577/9822475213
या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.