कोल्हापूर,
दि. 23 (जिमाका) : पंचगंगा नदीच्या दोन्ही तीरावरील भागात उन्हाळी हंगाम
2022-23 मधील कालावधीत शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या उपसा यंत्रावर पाणी उपसाबंदी करण्याचे आदेश पाटबंधारे
विभाग (उत्तर) चे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी दिले आहेत.
पंचगंगा नदीवरील इचलकरंजी ते शिरोळ
पर्यंत दिनांक 23 जून 2023 ते पुढील आदेशापर्यंत ही उपसाबंदी लागू राहिल. उपसाबंदी कालावधीत
पाण्याचा अनाधिकृत उपसा आढळून आल्यास संबंधित उपसायंत्र जप्त करुन परवाना धारकाचा उपसा
परवाना 1 वर्षाच्या कालावधीसाठी रद्द करण्यात येईल व होणाऱ्या नुकसानीस पाटबंधारे खाते
जबाबदार राहणार नाही, असेही श्री. बांदिवडेकर यांनी कळविले आहे.
0000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.