कोल्हापूर दि. १९ : कसबा बावडा सेवा रुग्णालय येथे उपसंचालक, आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ, कोल्हापूर डॉ. आर.एस.कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कुष्ठरोग पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया शिबीराचे दि. १७ ऑक्टोबर २०११ रोजी आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन आरोग्य सेवा (वैद्यकीय), कोल्हापूरचे डॉ. पी.एस.पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबीरात सांगली येथील भारती विद्यापीठाचे अस्थीरोग तज्ञ डॉ. नागेश नाईक यांनी सर्व कुष्ठरुग्णांची तपासणी केली असून यामध्ये एकूण ४१ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैक्ी २० कुष्ठरुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शस्त्रक्रिया पूर्व तपासणी शिबीराचे डॉ. एल.एस.पाटील , डॉ. व्ही. एस. पाटील यांचे सहकार्य लाभले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी डॉ. एस.बी. पाटील, डॉ. ए.एस. यादव व सर्व रुग्णालयातील कर्मचारी व सर्व कुष्ठरोग तंत्रज्ञ यांनी विशेष परिश्रम घेतले.
या शिबीराला शहरातील व ग्रामीण भागातील कुष्ठरोग रुग्ण मोठया संख्येने हजर होते.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.