** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, October 13, 2011

शासकीय तंत्रनिकेतन परिसरातील गवताचा लिलाव

           कोल्हापूर दि. १३ : शासकीय तंत्रनिकेतन, विद्यानगर, जुना पुणे-बेंगलोर रोड, कोल्हापूर येथील संस्था व वसतिगृह परिसरातील एकूण २६ एकरातील गवताचा लिलाव निविदा पध्दतीने करण्यात येणार आहे. निविदा फॉर्म संस्थेत विक्रीस उपलब्ध असून इच्छुक व्यक्तींनी २४ ऑक्टोबर २०११ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत निविदा पाठवाव्यात. गवत लिलावाची अपेक्षित कमीत कमी किंमत १९ हजार रुपये अधिक २० टक्के लोकल सेस फंड इतकी आहे. गवत लिलावाच्या अटी व शर्ती  संस्थेत सुट्टीचे दिवस वगळून सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत पहावयास मिळतील. प्राप्त निविदा २५ ऑक्टोबर २०११ रोजी दुपारी १२ वाजता उघडण्यात येतील. निविदा मंजूर अथवा नामंजूर करण्याचे सर्व अधिकार प्र. प्राचार्य यांनी राखून ठेवले आहेत.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.