** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, October 14, 2011

कैदी इराप्पा गुरुनाथ बिराजदार यांच्या मृत्युची दंडाधिकारी चौकशी सुरु

       कोल्हापूर दि. १४ :  जुना राजवाडा पोलीस ठाणे, कोल्हापूर  येथे शिक्षा भोगत असलेला कैदी इराप्पा गुरुनाथ बिराजदार (कैदी क्रमांक सी-३०५०) यांचा ४/०९/२०११ रोजी मृत्यू झाला असून त्यांच्या मृत्यूच्या दंडाधिकारीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
      या दंडाधिकारी चौकशीसाठी इचलकरंजीचे उपविभागीय दंडाधिकारी तुषार ठोंबरे यांची नियुक्ती करण्यात आली असून या बंदीच्या मृत्युबाबत कोणास काही माहिती, पुरावा, तक्रार आदी नोंदवायची असेल त्यांनी २१/१०/२०११ रोजी किंवा तत्पूर्वी उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, इचलकरंजी विभाग, इचलकरंजी  यांच्याकडे समक्ष आणून द्याव्यात. या तारखेनंतर येणार्‍या तक्रारी विचारात घेतल्या जाणार नाहीत, असे उपविभागीय दंडाधिकारी, इचलकरंजी विभाग, इचलकरंजी यांनी स्पष्ट केले आहे

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.