** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, October 5, 2011

कैदी मृत्यूंजय ऊर्फ संभाजी पवार यांच्या मृत्युची दंडाधिकारी चौकशी सुरु

     कोल्हापूर दि. ६ :  जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कळंबा कारागृहात शिक्षा भोगत असलेला कैदी मृत्यूंजय ऊर्फ संभाजी अनंत पवार (कैदी क्रमांक बी-६११४) यांचा १० जुलै २०११ रोजी मृत्यू झाला असून त्यांच्या मृत्यूच्या दंडाधिकारीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
      या दंडाधिकारी चौकशीसाठी इचलकरंजीचे उपविभागीय दंडाधिकारी तुषार ठोंबरे यांची नियुक्ती करण्यात आली असून या कैद्याच्या मृत्युबाबत कोणास काही माहिती, पुरावा, तक्रारआदी नोंदवायची असेल त्यांनी १५ ऑक्टोबर २०११ रोजी किंवा तत्पूर्वी उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, इचलकरंजी विभाग, इचलकरंजी यांच्याकडे समक्ष आणून द्याव्यात. या तारखेनंतर येणार्‍या तक्रारी विचारात घेतल्या जाणार नाहीत, असे उपविभागीय दंडाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.