** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, October 11, 2011

राजाराम महाविद्यालयातील कालबाह्य सामुग्रीचा १९ ऑक्टोबर रोजी जाहीर लिलाव

         कोल्हापूर दि. ११ : राजाराम महाविद्यालयाच्या विविध विभागातील निर्लेखित करावयाच्या निरुपयोगी कालबाह्य उपकरणे तथा इतर सामुग्रीचा लिलाव बुधवार दि. १९ ऑक्टोबर २०११ रोजी दुपारी २ वाजता बोली पध्दतीने करण्यात येणार आहे.
          इच्छुकांनी वरील तारखेस निर्धारीत वेळेत उपस्थित रहावे. संबंधीत बाबींची यादी कार्यालयात उपलब्ध आहे. लिलावाच्या अटी व शर्ती लिलावाच्या ठिकाणी पहावयास मिळतील, लिलाव मंजूर तथा नामंजूर करण्याचा अधिकार प्राचार्यांना राहील, असे प्राचार्य, राजाराम महाविद्यालय, कोल्हापूर यांनी प्रसिध्दी पत्रकाने कळविले आहे

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.