** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, December 2, 2019

हयातीचे दाखले 15 डिसेंबरपर्यंत जमा करावेत



           कोल्हापूर, दि. 2 (जि.मा.का.) : दुसऱ्या महायुध्दाचे अनुदान घेत असलेल्या माजी सैनिक, विधवा यांनी आपले हयातीचे दाखले 15 डिसेंबरपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात जमा करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी
सुभाष सासने यांनी केले आहे.
       हयातीचे दाखले दिलेल्या कालावधीत जमा न केल्यास लाभार्थींचे दुसरे महायुध्द अनुदान माहे जानेवारी 2020 महिन्यापासून बंद करण्यात येईल. हयातीचे दाखले सादर न केल्यामुळे अनुदान बंद झाल्यास यासाठी लाभार्थी स्वत: जबाबदार रहील, असेही श्री.  सासने यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.