** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, December 5, 2019

वारणानगरमध्ये रविवारी आर्चरी स्पर्धा



कोल्हापूर दि. 5 (जि.मा.का.) :  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हास्तरीय व मनपास्तरीय शालेय फिल्ड आर्चरी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी दिली.
       या स्पर्धा दि. 8 डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय, वारणा नगर येथे होणार आहेत. या स्पर्धांकरिता 14,17 व 19 वयोगटातील इ. 6 वी ते 12 वी मध्ये शिकणारे खेळाडू सहभागी होवू शकतात. इंडियन, रिकर्व आणि कंपाउंड या तीन प्रकारामध्ये या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धेतील विजयी खेळाडू विभाग-राज्य-राष्ट्रीय स्तराप्रमाणे पुढील स्पर्धेसाठी पात्र ठरतील. जास्तीत-जास्त खेळाडूंनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.