** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, December 2, 2019

42 वी डाक अदालत 20 डिसेंबर रोजी



कोल्हापूर, दि. 2 (जि.मा.का.) : पोस्टमास्तर जनरल, गोवा रिजन पणजीव्दारे 42 व्या डाक अदालतीचे आयोजन दि. 20 डिसेंबर रोजी सकाळी 11 वा. पोस्टमास्तर जनरल गोवा रिजन पणजी कार्यालयामध्ये करण्यात आले आहे. अशी माहिती प्रवर अधीक्षक ईश्वर पाटील यांनी दिली.
       गोवा रिजनशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारीचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक आदालतीमध्ये दखल घेतली जाईल. विशेषत: टपाल वस्तू, मनीऑर्डर, बचत खाते व प्रमाणपत्र बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख तपशीलासह केलेला असावा.
          संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार डाक सेवेचे सहायक निदेशक  जी. राजेश आणि सचिव डाक अदालत, पोस्ट मास्तर जनरल यांचे कार्यालय, गोवा रिजन पणजी यांच्या नावे दोन प्रतींसह दि. 6 डिसेंबर पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहाचेल अशा रितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची या डाक अदालतीमध्ये दखल घेतली जाणार नाही.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.