** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, December 5, 2019

चंदगड डाक कार्यालयात आधार नोंदणी शिबीर



कोल्हापूर दि. 5 (जि.मा.का.) :  चंदगड डाक कार्यालय चंदगड येथे आजपासून उद्या दि. 6 डिसेंबरपर्यंत विशेष आधार अद्ययावत व नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रवर अधीक्षक ईश्वर पाटील यांनी दिली.
इचलकरंजी प्रधान डाक घर येथे दि. 7 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते संध्या. 5 वाजेपर्यंत आधार अद्ययावत व नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये ग्राहकाला आपले आधार मधील नाव, पत्ता, जन्मतारीख व मोबाईल क्रमांक यामध्ये दुरूस्ती करता येईल, तसेच नवीन आधार नोंदणी करता येईल.
          चंदगड तालुक्यातील जास्तीत-जास्त ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. पाटील यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.