** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, May 17, 2022

मुंबई येथे 119 वी डाक अदालत

 


कोल्हापूर, दि. 17 (जिमाका) :  सर्कल स्तरावरील 119 वी डाक अदालत 17 जून रोजी दुपारी 3 वाजता मुख्य पोस्टमास्तर जनरल, मुंबई यांच्या कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली आहे.

महाराष्ट्र आणि गोवा राज्याशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतमध्ये दखल घेतली जाईल. विशेषत: टपाल वस्तु/मनी ऑर्डर/ बचत बँक खाते/ प्रमाणपत्र इत्यादीबाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा. उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठवली असेल त्याचे नाव व हुद्दा इ.

संबंधितांनी डाक सेवे बाबतची आपली तक्रार सहायक निदेशक डाकसेवा (ज.शि.) आणि सचिव, डाक अदालत, मुख्य पोस्टमास्टर जनरल यांचे कार्यालय, मुंबई जी.पी.ओ. इमारत, दुसरा माळा, मुंबई- 01 यांच्या नावे दोन प्रतीसह दि. 31 मे पर्यंत अथवा त्यापूर्वी पोहोचेल इशा रितीने पाठवावी, त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही.

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.