कोल्हापूर,
दि. 25 (जिमाका) : कु.
काजल सोनार ही दि. 7 मे 2019 रोजी चाईल्ड लाईन मार्फत व बालकल्याण समितीच्या
आदेशानुसार जरग नगर येथील शिशु आधार केंद्रात दाखल झाली आहे. काजल संस्थेत दाखल
झाल्यापासून आजपर्यंत तिला भेटण्यासाठी कोणीही आले नाही. तिच्याविषयी कोणाला
पालकत्व सांगावयाचे असल्यास बातमी प्रसिध्द झाल्यापासून 30 दिवसाच्या आत महिला
जीवन संवर्धक मंडळ, माझे माहेर, संचलित शिशु आधार केंद्र, जरगनगर, कोल्हापूर येथे
योग्य त्या कागदपत्राच्या पुराव्यासह पालकत्वाचा दावा करावा, असे आवाहन शिशु आधार
केंद्राच्या अधीक्षिका सुनीता भोसले यांनी केले आहे.
मुदतीनंतर कु. काजल सोनार हिच्या पुर्नसवन संदर्भात
सुरु केलेली प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत थांबविली जाणार नाही. अधिक माहितीसाठी श्रीमती जरग 9930359499 यांच्याशी संपर्क साधावा.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.