कोल्हापूर दि. 25 (जिमाका) : जिल्हा सैनिक
कल्याण कार्यालयाच्या कल्याणकारी निधीतून माजी सैनिकांना सदनिका खरेदी व मुलाच्या
शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात आली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण
अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रशांत खेडेकर यांनी दिली.
पन्हाळा
तालुक्यातील माजी सैनिक दिपक गौड, मौजे बहिरेवाडी यांना सदनिका खरेदिकरिता व माजी
सैनिक दत्तात्रय सनगर, मौजे माले यांना त्यांच्या मुलाच्या शिक्षणाकरिता प्रत्येकी
50 हजार रुपयांचा धनादेश प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्री.
खेडेकर यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आला.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.