कोल्हापूर, दि. 3 (जिमाका) : भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनुसूचित जाती,
विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील ज्या
विद्यार्थ्यांनी अद्यापही ऑनलाईन अर्ज भरलेले नाहीत त्या विद्यार्थ्यांसाठी
शासन स्तरावरुन सन 2021-22 मधील शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी व सन 2020-21
वर्षामधील अर्जाच्या नुतनीकरणासाठी 31 मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची
माहिती समाज कल्याण विभागाचे आयुक्त विशाल
लोंढे यांनी दिली आहे.
ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्यापही शिष्यवृत्तीचे अर्ज भरलेले
नाहीत, त्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज 31 मार्च पर्यंत https://mahadbtmai.ait.gov.in या संकेतस्थळावर तात्काळ भरावेत. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी
महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असणारे अर्ज छाननी करुन लवकरात लवकर ऑनलाईन
प्रणालीतून सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयकडे वर्ग करावेत, असे अवाहनही श्री. लोंढे
यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.