कोल्हापूर,
दि. 28 (जिमाका) : ‘सेवा परमो धर्म:’ या भावनेतून सेवा संकल्प अभियानाचा मुलींचे शासकीय
वसतिगृह, हातकणंगले येथे आज उत्साहात प्रारंभ झाला. यानिमित्त विविध सेवाभावी व सामाजिक
उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची
सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण
करण्यात आला. वसतिगृहातील मुलींनी प्रवेशद्वारावर आकर्षक रांगोळी साकारून परिसराची
सजावट केली.
मुलींमध्ये सेवा,
समर्पण आणि सामाजिक बांधिलकीची भावना रुजविण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्या बालपणातील जीवनमूल्ये व सेवाभावावर आधारित ‘चलो जीते हैं’ हा प्रेरणादायी लघुपट
दाखविण्यात आला.
अभियानांतर्गत
वसतिगृह व परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मुली व कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून
परिसराची स्वच्छता केली. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वसतिगृह परिसरात वृक्षारोपण
करण्यात आले.
मुली व कर्मचाऱ्यांच्या
उत्स्फूर्त सहभागामुळे अभियानाचा प्रारंभ कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
0000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.