** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Saturday, September 26, 2026

सेवा संकल्प अभियानांतर्गत शाहूवाडी तालुक्यात विविध योजनांचा आढावा


कोल्हापूर, दि. २६ : सेवा संकल्प अभियानांतर्गत शाहूवाडी तालुक्यातील सांबू, शिरगाव व सवते ग्रामपंचायतींना भेट देऊन विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा व प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

यावेळी प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण, ‘आशीर्वादचा दिवा’ उपक्रम, ‘सूर्यघर’ योजना तसेच मुख्यमंत्री पंचायतराज अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामांची माहिती घेण्यात आली. योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा वेळेत लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने आवश्यक सूचना करण्यात आल्या.

या पाहणीवेळी पंचायत समिती शाहूवाडीचे सांख्यिकी विस्तार अधिकारी श्री. कानडे, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता  करण कांबळे, संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी तसेच लाभार्थी उपस्थित होते.

**

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.