कोल्हापूर, दि. 29 (जिमाका) :
राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आज सकाळी 10 वा. कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले.
यावेळी त्यांचे प्रशासनाच्यावतीने
जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी स्वागत केले. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु
डॉ. राजनिश कामत, कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हा पोलीस
अधीक्षक निलोत्पल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, शिवाजी विद्यापीठाचे
प्र. कुलगुरु डॉ. ज्योती जाधव, वारणा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के, करवीर
उपविभागीय अधिकारी मौसमी चौगुले उपस्थित होते. विमानतळावर आगमन होताच राज्यपालांना
पोलीस दलाच्या वतीने 'गार्ड ऑफ ऑनर' (सलामी) देऊन मानवंदना देण्यात आली.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.