कोल्हापूर, दि. 28 (जिमाका) : दानोळी (ता. शिरोळ) येथे छत्रपती प्रतिष्ठानच्यावतीने
गणेशोत्सवानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात सेवा संकल्प अभियानांतर्गत
BP, शुगर, ECG, नेत्र तपासणीसह आभा व गोल्डन कार्डची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
शिबिराचे उदद्याटन सरपंच सुनिता वाळकुंजे यांच्या हस्ते करण्यात आले.
शिबिरात रक्तदाब, रक्तातील साखर,
ECG, नेत्र तपासणी करण्यात आले. तपासणीनंतर आवश्यकतेनुसार औषध उपचार, आरोग्य विषयक
सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उदय राऊत, मंडळाचे अध्यक्ष भरत मुळीक, उपाध्यक्ष
सुनिल चौगुले, अभय राऊत, सुजय राऊत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर, प्रभारी
वैद्यकीय अधिकारी डॉ. ए.एन. मोघे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना यादव आदी उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.