** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Saturday, September 26, 2026

भुदरगड पंचायत समितीतर्फे सेवा संकल्प अभियानात विविध लोक कल्याणकारी उपक्रमांचा हजारो नागरिकांनी घेतला लाभ

  

 

कोल्हापूर दि. २६ (जिमाका): पंचायत समिती भुदरगड अंतर्गत दिनांक २४ सप्टेंबर रोजी 'सेवा संकल्प अभियान' मोठ्या उत्साहात पार पडले. "सेवा माझे योगदान" या मुख्य संकल्पनेखाली राबविण्यात आलेल्या या अभियानात आरोग्य, पर्यावरण, स्वच्छता, महिला-बालविकास आणि पशुसंवर्धन या क्षेत्रांत विविध गतिमान उपक्रम राबवून तालुक्यातील हजारो नागरिकांना प्रत्यक्ष लाभ प्रदान करण्यात आल्याची माहिती गट विकास अधिकारी डॉ. शेखर जाधव यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली.

 

 सेवा माझे योगदान अंतर्गत ८५३ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींमध्ये ३ हजार ७५८ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये आभा कार्ड – ५१०, 

 गोल्डन कार्ड- ३४२, रक्त तपासणी- ३७३, नेत्र तपासणी- ४३१, अवयवदान - १२६, वयोवंदना योजना- ७१, NCD तपासणी- १ हजार ६१४, ईसीजी- २१९, एक्स-रे -७२ लाभार्थ्यांची वैद्यकीय सेवा व कार्ड वाटप करण्यात आले.

 

तालुक्यातील ९७ ग्राम पंचायतीमध्ये स्वच्छता ही सेवा अभियान सुरुवात करण्यात आले. पर्यवारण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यात आला यामध्ये २० हजार २८८ मूर्ती संकलित करण्यात आल्या तर ४ हजार ६३८ किलो निर्माल्य संकलन करण्यात आले. ९७ ग्राम पंचायतींमध्ये मध्ये प्लास्टिक वापरावर बंदी घालण्याबाबतचे ठराव मंजूर करण्यात आले. ६९ अंगणवाडी मध्ये पोषण अभियान मध्ये पाककृती, पोषण पंगत हे उपक्रम राबविले. २२ शाळांमधील २०४ विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्ती जनजागृती उपक्रमात सक्रीय सहभाग घेतला. दि. १ ते १० ऑक्टोबर या कालावधीत चित्रकला/वक्तृत्व स्पर्धा घेण्यात नियोजन केले आहे.

 

 तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतींमधील २७० अंगणवाड्यांमध्ये वृक्षारोपण उत्सव पार पडला. अंगणवाड्यांमध्ये CBE कार्यक्रम व गृहभेटी देऊन १ हजार ३०३ लाभार्थ्यांनी सहभाग घेतला. दि.१७ सप्टेंबर २०२६ रोजी ९७ ग्रामपंचायतींमध्ये 'संकल्पाची रांगोळी' काढून अभियानाचा प्रचार करण्यात आला. ७ ग्रामपंचायतींमध्ये लसीकरण मोहीम राबवण्यात आली. यामध्ये ४१० पशूंची तपासणी, ४४० डोस लसीकरण, २६५ पशुपालकांची उपस्थिती आणि २७० पशुपालकाचे NDLM प्रणालीवर आधार अपडेट करण्यात आले.  जल सेवा यात्रा / जल अर्पण दिवस हे दिनांक २ ऑक्टोबर २०२६ रोजी ४ ग्रामपंचायतींमध्ये आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

***


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.