** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, November 15, 2011

अभिजीत घोरपडे यांचे आज कोल्हापुरात व्याख्यान

       कोल्हापूर दि. १५ : राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त उद्या बुधवारी, दि. १६ नोव्हेंबर २०११ रोजी लोकसत्ता, पुणेचे वरिष्ठ सहसंपादक अभिजीत घोरपडे यांचे व्याख्यान होणार आहे.
      विभागीय माहिती कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर आणि कोल्हापूर प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
      श्री. घोरपडे पत्रकारिता - सार्वजनिक जबाबदारीचं माध्यम या विषयावर व्याख्यान देतील. बुधवारी शाहू स्मारक भवन येथे दुपारी चार वाजता हे व्याख्यान होईल. या व्याख्यानास उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.