कोल्हापूर दि. २८ : सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ २०११ आणि विजय दिवस असा संयुक्त कार्यक्रम बुधवार दि. ७ डिसेंबर २०११ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील महाराणी ताराबाई सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमास कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक तुकाराम चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्ना, पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव, स्टेशन हेडक्वार्टर्सचे स्टेशन कमांडर कर्नल विजय मणराल, एन. सी. सी. ग्रुप कमांडर कर्नल एच. एस. ग्रेवाल, कोल्हापूरचे सैन्य भरती अधिकारी कर्नल मुरली गोविंदा कुरुप यावेळी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील वीर पत्नी, वीर माता, वीर पिता व शौर्यपदक विजेत्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. गतवर्षी ध्वजदिन निधीनिमित्त उत्कृष्ट निधी जमविणारे अधिकारी व व्यक्तींचाही पारितोषिक प्रदान करुन सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व युध्द विधवा, वीर माता-पिता, माजी सैनिक, इतर माजी सैनिक व अवलंबितांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त ले. कर्नल सुहास द. नाईक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.