** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, November 9, 2011

गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा कार्यक्रम

      कोल्हापूर दि. ९ : राज्याचे गृह, ग्रामविकास आणि अन्न व औषध प्रशासन खात्याचे राज्यमंत्री सतेज पाटील १० नोव्हेंबर २०११ रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
      दि. १० नोव्हेंबर २०११ रोजी सकाळी ११-०५ वाजता मुंबईहून कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व शासकीय विश्रामगृह, कोल्हापूरकडे प्रयाण. ११-२० वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आगमन व राखीव. दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह येथे कॉग्रेस कार्यकर्ते भेटीगाठीसाठी राखीव व त्यानंतर कोल्हापूर येथील स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती व यशवंत निवास, कसबा बावडा, कोल्हापूर येथे मुक्काम, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.
      

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.