** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, November 5, 2019

5780 नुकसानग्रस्तांच्या खात्यावर 21 कोटी 4 लाख 34 हजार 879 जमा -डॉ. विकास खरात



कोल्हापूर, (जि.मा.का.) दि. 5 : शिरोळ तालुक्यातील 4046 नुकसानग्रस्तांना 14 कोटी 36 लाख 26 हजार 289 रुपये तर हातकणंगले तालुक्यातील 1734 नुकसानग्रस्तांना 6 कोटी 68 लाख 8 हजार 590 रुपये असे एकूण 21 कोटी 4 लाख 34 हजार 879 खात्यावर जमा केले आहेत, अशी माहिती प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी दिली.
            ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरामध्ये अनेक घरांची पूर्णत: तर अनेक घरांची काही प्रमाणात पडझड झाली. ज्या भागात महापुराचे पाणी शिरले त्या भागातील यंत्रमाग व्यवसायासह दुकाने, गॅरेज, हस्तकला आदींसह लहान सहान व्यवसायांनाही नुकसान सोसावे लागले. सर्व नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण करण्यात आले. उद्योगांसाठी नुकसानीच्या 75 टक्के अथवा जास्तीत जास्त 50 हजार रुपये यापैकी जी जास्त रक्कम असेल ती अनुदान मदत स्वरुपात देण्यात आली आहे.
            प्रांताधिकारी डॉ. खरात म्हणाले, शिरोळ तालुक्यातील नुकसानग्रस्त लहानसहान  4046 उद्योग व्यवसायांसाठी 14 कोटी 36 लाख 26 हजार 289 रुपये अनुदान बँक खात्यावर जमा केले आहे. 2082 जनावरांच्या गोठ्यासाठी 62.46 लाखाचे अनुदान दिले आहे. यापूर्वी पूर्णत: पडझड झालेल्या 2396 घरांसाठी 6 कोटी 29 लाख 88 हजार रुपये दिले गेले आहेत. मृत 455 गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्यांची नुकसान भरपाई म्हणून 91.19 लाख रुपये देण्यात आले आहेत. पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून प्रारंभी 5 हजार रुपये सानुग्रह अनुदानापोटी 18 कोटी 85 लाख 35 हजार रुपये दिले गेले. तर नंतर बँक खात्यावर प्रत्येक कुटुंबाला 10 हजार रुपयाप्रमाणे 22 कोटी 93 लाख 15 हजार रुपये जमा करण्यात आले.
            निर्वाह भत्त्यापोटी 9 कोटी 70 लाख 87 हजार 695 रुपये दिले गेले. याचा लाभ शहरी  8156  आणि ग्रामीण भागातील 29551 अशा एकूण 37 हजार 707 कुटुंबांना झाला आहे.  घरभाड्यापोटी शहरी भागात प्रत्येक कुटुंबाला 36 हजार तर ग्रामीण भागातील कुटुंबाला 24 हजार रुपये देण्यात आले आहेत.
            त्याचप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील नुकसानग्रस्त लहानसहान 1734 उद्योग व्यवसायांसाठी 6 कोटी 68 लाख 8 हजार 590 रुपये अनुदान बँक खात्यावर जमा केले   आहे. महापूराचा फटका बसलेल्या 885 जनावरांच्या गोठ्यासाठी 26.55 लाखाचे अनुदान दिले आहे. यापूर्वी पूर्णत: पडझड झालेल्या 781 घरांसाठी 2 कोटी 26 हजार 92 हजार रुपये दिले गेले आहेत. महापुरामुळे मृत 134 गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्यांची नुकसान भरपाई म्हणून 30 लाख रुपये देण्यात आले आहेत. पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून प्रारंभी 5 हजार रुपये सानुग्रह अनुदानापोटी 8 कोटी 81 लाख 30 हजार रुपये दिले गेले. तर नंतर बँक खात्यावर प्रत्येक कुटुंबाला 10 हजार रुपयाप्रमाणे 14 कोटी 49 लाख 85 हजार रुपये जमा करण्यात आले.
            निर्वाह भत्त्यापोटी 2 कोटी 91 लाख 99 हजार 765 रुपये दिले गेले. याचा लाभ इचलकरंजीतील 8918 आणि ग्रामीण भागातील 9968  अशा एकूण 18 हजार 886 कुटुंबांना झाला आहे. महापुरामुळे स्थलांतरित व्हावे लागल्याने घरभाड्यापोटी शहरी भागात प्रत्येक कुटुंबाला 36 हजार तर ग्रामीण भागातील कुटुंबाला 24 हजार रुपये देण्यात आले असल्याचेही डॉ. खरात यांनी सांगितले.

0000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.