कोल्हापूर, दि. 21 (जिमाका) : 111 वी डाक अदालत 16 डिसेंबर रोजी सकाळी 11
वाजता मुख्य पोस्टमास्तर जनरल, मुंबई यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली
असल्याची माहिती प्रवर अधीक्षक ईश्वर पाटील यांनी दिली.
महाराष्ट्र आणि गोवा राज्याशी संबंधित
सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झाले
नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा
तक्रारींची या डाक अदालतीमध्ये दखल घेतली जाणार आहे. विशेषत: टपाल वस्तु, मनी
ऑर्डर, बचत बँक खाते, प्रमाणपत्र इत्यादी बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील.
तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा.
संबंधितांनी डाकसेवेबाबतची आपली तक्रार
सहायक निदेशक डाकसेवा (ज.शि.) चे एच.एम. मंजेश
व सचिव डाक अदालत, मुख्य पोस्टमास्टर जनरल यांचे कार्यालय, जी.पी.ओ. इमारत,
दुसरा माळा, मुंबई - 400001 यांच्या नावे दोन प्रतीसह दिनांक 30 नोव्हेंबर पर्यंत
अथवा त्यापूर्वी पोहचेल अशा रितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल
घेतली जाणार नाही. प्रपत्र महाराष्ट्र टपाल सर्कलच्या वेबसाईट-www.maharashtrapost.gov.in
वर उपलब्ध आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.