** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, November 13, 2019

शासकीय संकेतस्थळ अद्ययावत ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश चुकीची व अपूर्ण माहिती दुरूस्त करण्यास प्राधान्य



कोल्हापूर, दि. 13 (जि.मा.का.): कोल्हापूर जिल्हा शासकीय संकेत स्थळावरील सर्वंच माहिती अद्ययावत करण्यात येत असून कोल्हापूर जिल्ह्याविषयीची माहिती अधिक अचूक व खात्रीशीर देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी एनआयसीला दिले आहेत.
       जिल्हा प्रशासनाने एनआयसीच्या मदतीने कोल्हापूर जिल्हा शासकीय संकेतस्थळ विकसित केले असून यामध्ये नमुद केलेल्या माहितीमध्ये चुकीची माहिती व संदर्भ अपलोड होता कामा नये, अशी सक्त सूचनाही जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी संबंधितांना दिली. तसेच चुकीची व अपूर्ण माहिती तात्काळ दुरूस्त करून शासकीय संकेतस्थळ अधिक अद्ययावत कसे राहील याचीही खरबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच यामध्ये टंकलेखनाच्या चुकाही असून त्या दुरूस्त करण्यात येतील व अशा चुकांबाबत संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश निवासी उप जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी स्पष्ट केले.
000000




No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.