** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, November 25, 2019

संविधान दिनानिमित्त आज रॅली



        कोल्हापूर, दि. 25 (जि.मा.का.) :   उद्या मंगळवार  दि.26 नोव्हेंबर  रोजी संविधान दिन साजरा करण्यात येणार आहे.  यानिमित्त शालेय विद्यार्थ्यांची रॅली आयोजित करण्यात आली आहे. दसरा चौकातून सकाळी 8 वाजता सुरू होणाऱ्या या रॅलीत शहारातील विविध शाळांमधील सुमारे 1 हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत, अशी माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी दिली.
            दसरा चौकातील श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यापासून महापौर सुरमंजिरी लाटकर यांच्या हस्ते संविधान रॅलीचा प्रारंभ होणार आहे. दसरा चौक, अयोध्या टॉकीज (लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन चौक) मार्गे  बिंदु चौक येथे रॅलीचा समारोप होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त मल्लीनाथ कलशेट्टी, पोलीस अधिक्षक  डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल,  खासदार, आमदार, यांच्यासह नागरिक उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाप्रसंगी संविधान उद्देशिकेचे वाटप करण्यात येवून उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात येणार आहे.
            याबरोबरच जिल्हा परिषद, सर्व पंचायत समित्या, सर्व ग्रामपंचायती, सर्व प्राथमिक /माध्यमिक शाळा, सर्व अनुदानित शाळा येथेही संविधान दिन साजरा करण्यात येणार असल्याची माहिती श्री. कामत यांनी प्रसिद्धीपत्रकारद्वारे दिली आहे.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.