मयत बिपीन कुमार आर्य यांच्या मृत्यूची
दंडाधिकारीय चौकशी
कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) : बिपीन कुमार आर्य, रा.
उत्तरप्रदेश सध्या शिरोली एमआयडीसी शिये,ता. करवीर, कोल्हापूर यांचा इंडस्ट्रियल
गॅसेस प्रा.लि. प्लॉट नं.-D-30 शिरोली एमआयडीसी या कंपनीमध्ये असताना दिनांक 17
जून 2018 रोजी मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूबाबत चौकशी करण्यासाठी इचलकरंजीचे
उपविभागीय दंडाधिकारी डॉ. विकास खरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोणाला काही माहिती, पुरावा, तक्रार
नोंदवायची, द्यायची असेल त्यांनी दिनांक 7 डिसेंबर पर्यंत अथवा त्यापूर्वी समक्ष
आणून द्याव्यात. या तारखेनंतर येणाऱ्या कोणत्याही तक्रारी विचारात घेतल्या जाणार नाहीत,असे उपविभागीय दंडाधिकारी यांनी
कळविले आहे.
0000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.