कोल्हापूर दि. 27 (जि.मा.का.) : 3 डिसेंबर
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण विभाग,
जिल्ह्यातील सर्व दिव्यांगाच्या विशेष शाळा, कार्यशाळा व रोटरी क्लब ऑफ क्लब ऑफ
होरायझन यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग मुलांच्या जिल्हास्तरीय क्रीडा
स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा
परिषद अध्यक्षा शौमिक महाडिक यांनी स्पर्धेच्या ठिकाणी भेट देवून शंभर मी धावणे या
स्पर्धेतील विजयी खेळाडूंना बक्षिस वितरण करण्यात आले. स्पर्धेतील इतर विजेत्या
स्पर्धकांना रोटरी क्लब ऑफ होरायझनचे
पदाधिकारी व सदस्य यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.
या
स्पर्धेत 600 विद्यार्थी, 300 शिक्षक, क्रिडाशिक्षक, प्रशिक्षक तसेच पालकवर्ग
उपस्थित होते. आभार स्वरुपा भारद्वाज यांनी मानले.
00000


No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.