** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, November 6, 2019

जिल्हा बाल कामगार मुक्त करू 7 डिसेंबरपर्यंत जनजागृती मोहीम





कोल्हापूर, (जि.मा.का.) दि. 6 : जिल्हा बाल कामगार मुक्त करण्यासाठी जिल्ह्यात 7 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर या कालावधीत बाल कामगार प्रथेविरूध्द जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी दिली.
बाल व किशोरवयीन कामगार सुधारणा अधिनियम 2016 नुसार 14 वर्षाखालील बालकांना कामावर ठेवणे तसेच 14 ते 18 वयोगटातील मुलांना धोकादायक उद्योग व प्रक्रीयांमध्ये कामावर ठेवणे गुन्हा आहे. मालकाने किंवा नियोक्त्याने बाल अथवा किशोरवयीन मुलांना कामावर ठेवल्यास त्यांना 20 ते 50 हजार रूपये पर्यंत दंड  वा 6 महिने ते 2 वर्षापर्यंत कारावास होऊ शकतो किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकते. त्यामुळे बाल अथवा किशोरवयीन मुलांना कामावर ठेवू नये, असे आवाहन श्री. गुरव यांनी केले आहे.
0000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.