अंत्योदय कार्डधारकांसाठी
जानेवारीचे साखर नियतन
कोल्हापूर दि. 27 (जि.मा.का.) : जिल्हयातील
अंत्योदय रेशन कार्डधारकांना
वीस रुपये प्रति किलो प्रमाणे प्रतिकुटुंब एक किलो साखर मंजूर करण्यात आली असून
जानेवारीसाठीची मंजूर साखर उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा
अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी दिली.
जानेवारी ते
मार्च 2020 या तिमाहीसाठी अंत्योदय रेशन कार्डधारकांना प्रतिकुटुंब एक किलो प्रमाणे पुरवठा
करण्याकरिता 1484 क्विंटल साखरेची मागणी करण्यात आली असून जानेवरी 2020 करिता
तालुकानिहाय नियतन पुढीलप्रमाणे आहे.
शासकीय गोदाम रमणमळा, ता. करवीर 13.60 क्विंटल, शासकीय गोदाम रमणमळा, कोल्हापूर शहर- 30.91 क्विंटल, शासकीय गोदाम पोर्ले तर्फे ठाणे, ता. पन्हाळा- 35.91 क्विंटल, शासकीय गोदाम हातकणंगले 49.92 क्विंटल, शासकीय गोदाम इचलकरंजी 48.05 क्विंटल, शासकीय गोदाम जयसिंगपूर ( ता. शिरोळ ) 46.42 क्विंटल, शासकीय गोदाम कागल 40.90 क्विंटल , शासकीय गोदाम शाहूवाडी
32.31 क्विंटल, शासकीय गोदाम गगनबावडा 8.79 क्विंटल, शासकीय गोदाम भूदरगड 27.80 क्विंटल, शासकीय गोदाम गडहिंग्लज 57.88 क्विंटल, शासकीय गोदाम आजरा 37.60 क्विंटल, शासकीय गोदाम चंदगड
60.06 क्विंटल, शासकीय गोदाम राधानगरी 42.98 क्विंटल असून यासाठीचे पुरवठादार गुरु गणेश ट्रेडीग कंपणी हे आहेत.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.