** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, January 14, 2020

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत गुरूवारी भरती मेळावा



       कोल्हापूर, दि. 14 (जिमाका) : औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळंबा येथे गुरूवार दि. 16 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता शिकाऊ उमेदवारी योजनेंतर्गत भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे उप प्राचार्य एम.एस. आवटे यांनी दिली.
        मेळाव्यासाठी उमेदवार आयटीआय, एमएसबीव्हीई, एमसीव्हीसी 12 वी उत्तीर्ण व फ्रेशर उमेदवार असावा. या मेळाव्यांतर्गत पात्र उमेदवारास मोठ्या आस्थापनेत, कारखान्यात ॲप्रेन्टीसशीप करण्याची सुवर्णसंधी. प्रशिक्षण कालावधीत नियमानुसार विद्यावेतन. प्रशिक्षण कालावधीनंतर प्रमाणपत्र. मेळाव्यात निवड केली जावून थेट भरती केली जाणार आहे.
           कोल्हापूर व परिसरातील अनेक आस्थापनांमधून मोठ्या प्रमाणात ॲप्रेन्टीसशीपची भरती केली जाणार असून याचा आय.टी. आय. पास प्रशिक्षणार्थींनी लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. आवटे यांनी केले आहे.
00000
      

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.