कोल्हापूर, दि. 10 (जिमाका) : जिल्हा विधी सेवा
प्राधिकरणामार्फत शनिवार दि. 8 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन
करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पंकज देशपांडे
यांनी दिली.
या
लोकअदालतीमध्ये जिल्ह्यातील सर्व न्यायालयातील प्रलंबित दिवाणी व तडजोडयोग्य
फौजदारी खटले, मोटर अपघात खटले, दाखलपूर्व खटले देखील ठेवण्यात येणार आहेत. सर्व
बँका, पतसंस्था, इन्शुरन्स कंपन्या तसेच एमएसईबी, राज्य परिवहन महामंडळ व इतर
संबंधित कंपन्यांना आपल्या
प्रिलिटीगेशनच्या केसेस या लोकअदालतीमध्ये ठेवायच्या असतील तर त्यांनी योग्य
कागदपत्रासह दि. 31 जानेवारीपर्यंत सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाशी
संपर्क साधावा, असेही श्री. देशपांडे यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.