** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, January 10, 2020

रिक्षामध्ये अनधिकृतपणे गॅस रिफिलिंग 45 हजाराचा मुद्देमाल जप्त : दोघांविरुध्द पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल




       कोल्हापूर, दि. 10 (जिमाका) : रिक्षामध्ये अनधिकृतपणे गॅस रिफिलिंग करतांना रिफिलिंगचे साहित्य व अन्य मुद्देमाल असा 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी राजू चंद्रकांत मस्के (व.व.38, रा. लक्षतीर्थ वसाहत) व रिक्षाचालक रमेश रामदास मोरे (व.व. 40, रा. सुतारमळा, रंकाळा परिसर) यांच्याविरुध्द पुरवठा निरीक्षक काशिनाथ रामचंद्र पालकर यांनी राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद  दाखल केली आहे..
       अन्नधान्य वितरण अधिकारी माधवी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा निरीक्षक काशिनाथ रामचंद्र पालकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी बुधवार दि. 8 जानेवारी रोजी रंकाळा बस स्टॅण्डच्या मागील शिवनेरी अर्पाटमेंट, यात्री निवासच्या दारात छापा टाकून रिक्षामध्ये अनधिकृतपणे गॅस रिफिलिंग करतांना रिफिलिंगचे साहित्य व अन्य मुद्देमाल असा एकूण 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये आरोपी राजू चंद्रकांत मस्के (व.व.38, रा. लक्षतीर्थ वसाहत) व रिक्षाचालक रमेश रामदास मोरे (व.व. 40, रा. सुतारमळा, रंकाळा परिसर) यांच्याविरुध्द भा.द.वि.स. कलम 286 सह जीवनावश्यक कायदा 1955 चे कलम 3 व 7 नुसार राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद  दाखल केली आहे.
       पुरवठा निरीक्षक काशिनाथ रामचंद्र पालकर यांच्या फिर्यादिनुसार शिवाजी पेठेत रंकाळा बस स्टॅण्डच्या मागील शिवनेरी अर्पाटमेंट, यात्री निवासच्या दारात रिक्षामध्ये अनधिकृतपणे गॅस रिफिलिंग करून देण्याचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळताच पुरवठा निरीक्षक काशिनाथ पालकर, सुरेश टिपुगडे, बबन घोडके, सतिश शिंदे, आदम नायकवडी आदि सहकाऱ्यासमवेत छापा टाकून रिक्षामध्ये अनधिकृतपणे गॅस रिफिलिंग करतांना रिफिलिंगचे साहित्य व अन्य मुद्देमाल जप्त केला.        
          या छाप्यात जप्त मुद्देमालामध्ये अडीच हजार रूपये किंमतीचे एच.पी. गॅस सिलेंडर टाकी, 3 हजार किंमतीचा शार्प कंपनीचा वजनकाटा, 4 हजार 500 किंमतीचे गॅस भरणीचे मोटारगन एका बाजूस नॉब व एका बाजूला हाय प्रेशर रेग्युलेटर पाईपला जोडलेली, 35 हजार किमंतीची तीन चाकी रिक्षा नं. MH09-J-2671 बाबत काळा पिवळा पट्टा असलेली रिक्षाही जप्त केली आहे.     
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.