** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, January 15, 2020

शेतकऱ्यांनी शेडनेट व वैयक्तिक अस्तरीकरणासाठी आपले अर्ज ऑफलाईन पध्दतीने भरावेत - ज्ञानदेव वाकुरे



       कोल्हापूर, दि. 15 (जि.मा.का.) : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजना सन 2019-20 अंतर्गत संरक्षित शेती घटकांतर्गत शेडनेट व वैयक्तिक अस्तरीकरण या बाबींसाठी जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून 7 दिवसाचे आत इच्छुक शेतकऱ्यांनी आपले ऑफलाईन अर्ज तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे जमा करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे.
       एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजना सन 2019-20 अंतर्गत शेडनेट व वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण घटकाची हॉर्टनेट प्रणालीवर घटकनिहाय व उपघटकनिहाय अर्जांची प्रतिक्षा यादी संपली आहे. सद्यस्थितीत सदर घटकांचा लक्षांक जिल्हास्तरावर शिल्लक आहे.
        या अनुषंगाने संरक्षित शेती घटकांतर्गत शेडनेट व वैयक्तिक अस्तरीकरण या बाबींसाठी जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून 7 दिवसाचे आत इच्छुक शेतकऱ्यांनी आपले ऑफलाईन अर्ज तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे जमा करावेत. लक्षांकापेक्षा जादाचे अर्ज प्राप्त झाल्यास सोडत काढून योजनेची अंमलबजावणी मार्गदर्शक सूचनेनुसार करण्यात येईल.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.