** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, January 22, 2020

प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण



 कोल्हापूर, दि. 22 (जि.मा.का.) : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय सोहळा दिनांक 26 जानेवारी 2020 रोजी सकाळी 9.15 वाजता पालकमंत्री सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांच्या हस्ते होणार असल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कळविले आहे.
छत्रपती शाहू स्टेडियम (छ. शिवाजी स्टेडियमच्या पूर्वेकडील स्टेडियम) कोल्हापूर येथे होणाऱ्या  ध्वजारोहणाच्या या मुख्य शासकीय सोहळ्यास जिल्ह्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी केले आहे.
0000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.