** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, January 13, 2020

डेहराडून प्रवेश पात्रता परीक्षा 1 व 2 जून रोजी



कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून प्रवेश पात्रता परीक्षा दि. 1 व 2 जून रोजी पुण्यात घेण्यात येणार आहे.  ही परीक्षा फक्त मुलांसाठीच आहे.
       परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांचे वय दि. 1 जानेवारी 2021 रोजी 11 11/2 (अकरा वर्ष सहा महिने) पेक्षा कमी व 13 वर्षापेक्षा अधिक नाही असे विद्यार्थी या परीक्षेस पात्र समजण्यात येतील. म्हणजेच विद्यार्थ्याचा जन्म दि. 2 जानेवारी 2008 च्या आत आणि दि. 1 जुलै 2009 च्या नंतरचा नसावा. (म्हणजेच विद्यार्थ्याचा जन्म दि. 2 जानेवारी 2008 ते दि. 1 जुलै 2009 या कालावधीत असावा.)
           शैक्षणिक पात्रता- विद्यार्थी दि. 1 जानेवारी 2021 ला कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेमध्ये इ. 7 वी या वर्गात शिकत असावा किंवा 7 वी उत्तीर्ण असावा. परीक्षेसाठी कमांडंट, राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून, उत्तराखंड 248 003 यांच्याकडून विहीत नमुन्यातीलच आवेदनपत्रे घ्यावयाची आहेत. विद्यार्थ्यांनी अनुसूचित जाती/ जमातीसाठी 555 रूपये (जातीच्या दाखल्याच्या सत्यप्रतीसह) आणि जनरल संवर्गातील विद्यार्थ्यांनी 6  रूपयाचा डिमांड ड्राफ्ट देणे आवश्यक आहे. या डिमांड ड्राफ्ट फक्त स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचाच असावा तो कमांडंट, आर.आय.एम.सी., डेहराडून यांच्या नावे काढावा, डिमांड ड्राफ्टवर पेअेबल ॲट डेहराडून (तेलभवन बँक Code No.01576) अशी नोंद करावी व तो  कमांडंट, राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून, उत्तराखंड 248003 या पत्यावरती पाठवून देण्यात यावा. (तसेच आवेदनपत्र आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपला पूर्ण पत्ता पिनकोड सह, स्पीड पोस्ट पाकिटावर नमूद करावा) डिमांड ड्राफ्ट पाठविल्यानंतर आवेदनपत्र, माहितीपत्र व मागील 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका संच कमांडंट, राष्ट्रीय इंडियन मिलिअरी कॉलेज डेहराडून, उत्तराखंड 248003 यांच्याकडून स्पीड पोस्टाने आपणास आपण दिलेल्या पत्त्यावरती पाठवण्यात येतील.
        परिपूर्ण भरलेली आवेदनपत्रे दि. 31 मार्चपर्यंत आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, 17 डॉ. आंबेडकर मार्ग, लाल देवळाजवळ, पुणे 411001 यांच्याकडे पोहचतील अशा प्रकारे स्पीड पोस्टाने पाठवावीत किंवा समक्ष येवून जमा करावीत. त्यानंतर आलेली आवेदनपत्रे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारण्यात येणार नाहीत. आवेदनपत्र दोन प्रतीत भरणे आवश्यक आहे. त्यासोबत जन्मतारखेच्या दाखल्याची प्रत, जातीच्या दाखल्याची छायांकित प्रत, अधिवास दाखल्याची सत्यप्रत, शाळेच्या बोनाफाईड सर्टिफिकेटची मूळ प्रत फोटोसह जोडणे आवश्यक आहे.
          परीक्षेसाठी इंग्रजी, गणित आणि सामान्य ज्ञान या तीन विषयावर पेपर असतील. गणित व  सामान्य ज्ञान विषयाच्या प्रश्नपत्रिका इंग्रजी/ हिंदी या भाषेत उपलब्ध होतील. लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती मंगळवार दि. 6 ऑक्टोबर रोजी घेण्यात येतील.
00000



No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.