** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, January 20, 2020

जिल्हा नियोजन समितीची शुक्रवारी सभा


       कोल्हापूर, दि. 20 (जिमाका)  : जिल्हा नियोजन समितीची सभा शुक्रवार दि. 24 जानेवारी रोजी सकाळी 11 वा. राजर्षी शाहू छत्रपती सभागृह, जिल्हा परिषद येथे पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव दौलत देसाई यांनी दिली.
       या बैठकीत दि. 23 जून 2019 रोजी संपन्न झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे इतिवृत्तास व इतिवृत्त कार्यपूर्ती अहवालास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना सन 2019-20 अखेर खर्चाचा आढावा, सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती घटक कार्यक्रम, आदिवासी घटक कार्यक्रम बाह्य योजना 2020-21 च्या आराखड्यास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजनांतर्गत पुनर्विनियोजन प्रस्तावास मान्यता देणे व आयत्यावेळचे विषय असे विषय होणार आहेत.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.