** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, July 5, 2022

14 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1100 क्युसेक विसर्ग

 

          कोल्हापूर, दि. 5 (जिमाका) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 75.04 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी व तेरवाड, भोगावती नदीवरील- हळदी व सरकारी कोगे, कासारी नदीवरील- वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे व कुंभी नदीवरील- मांडूकली व शेणवडे असे 14 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणातून 14 हजार 152 तर अल्लमट्टी धरणातून 12 हजार 684 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 40.87 दलघमी, वारणा 324.35 दलघमी, दूधगंगा 200.20 दलघमी, कासारी 30.16 दलघमी, कडवी 23.98 दलघमी, कुंभी 32.46 दलघमी, पाटगाव 39.33 दलघमी, चिकोत्रा 19.44 दलघमी, चित्री 17.45 दलघमी, जंगमहट्टी 14.21 दलघमी, घटप्रभा  31.97 दलघमी, जांबरे 8.86 दलघमी, आंबेआहोळ 18.79, कोदे (ल.पा) 3.50 दलघमी असा आहे.

            तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 23.10 फूट, सुर्वे 22 फूट, रुई 48.6 फूट, इचलकरंजी 45.6, तेरवाड 39.9 फूट, शिरोळ 29.9 फूट, नृसिंहवाडी 23.7 फूट, राजापूर 10.9 फूट तर नजीकच्या सांगली 4.9 फूट व अंकली 5.4  फूट अशी आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.