** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, July 18, 2022

माजी सैनिक, पाल्यांनी शिष्यवृत्तीसाठी 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करावेत

 

 

कोल्हापूर, दि. 18 (जिमाका) : शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी अद्याप अर्ज सादर केला नसेल अशा माजी सैनिक/दिवंगत माजी सैनिकाच्या पत्नी/माजी सैनिकांच्या अनाथ पाल्यांना संपूर्ण/उर्वरित कालावधीकरीता शिष्यवृत्ती प्रदान करण्याकरीता माजी सैनिक/दिवंगत माजी सैनिकाच्या पत्नी यांनी दिनांक 30 सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 10 वी, 12 वी, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये कमीत कमी 60 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुणासह उत्तीर्ण होऊन पुढील वर्गात शिकत आहेत अशा तसेच सन 2018-19, 2019-20 व 2020-21 या शैक्षणिक वर्षात नमुद निकषानुसार उत्तीर्ण होऊन पुढील वर्षात शिकत आहेत अशांनी अर्ज सादर करावेत.  

30 सप्टेंबरपर्यंत प्राप्त अर्जांची छाननी प्राधान्याने करण्याचे नियोजित असून नंतर प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी मार्च 2023 मध्ये केली जाईल. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी क्रमांक  0231-2665812 वर संपर्क साधावा, असेही श्री. खेडेकर यांनी कळविले आहे.

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.