** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, July 13, 2022

सेवायोजन कार्डशी आधार लिंक करताना अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधा -सहायक आयुक्त संजय माळी

 


कोल्हापूर, दि. 13 (जिमाका): सेवायोजन कार्डशी आधार लिंक करताना काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.

            जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्राच्या महास्वंयम पोर्टलवर उमेदवारांनी नोंदणी केली आहे. ज्या उमेदवारांनी एम्लॉयमेंट कार्डला आधार कार्ड नंबर, ई-मेल, मोबाईल नंबर लिंक केलेला नाही, अशा उमेदवारांनी एम्लॉयमेंट कार्डमध्ये आधार कार्ड नंबर, ई-मेल, मोबाईल नंबर याची माहिती ऑनलाईन भरावयाची आहे.

            माहिती अद्यावत करण्यासाठी उमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाने विकसित केलेल्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाच्या मुख्य पृष्ठावरील रोजगार (Employment) हा पर्याय निवडून नोकरी साधक (Job Seeker) हा पर्याय निवडून युजर आयडी व पासवर्ड वापरुन Login व्हावे व आधार नंबर या ठिकाणी आधार नंबर नमूद करुन कॅप्च्या (Captcha) टाकून सबमिट (Submit) या बटनावर क्लिक करावे, जेणेकरून माहिती अद्यावत होईल. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 0231-2545677 वर संपर्क साधावा

00000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.