** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, July 12, 2022

थेट अभिकर्ता पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 


कोल्हापूर, दि. 12 (जिमाका): टपाल जीवन विमा व ग्रामीण टपाल जीवन विमाकरिता थेट अभिकर्ता पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्जासह 23 जुलैपूर्वी कोल्हापूर डाकघर येथे आपल्या शैक्षणिक प्रमाणपत्र तसेच पॅन कार्ड, आधार कार्ड व अन्य संबंधित दस्ताऐवजाच्या सत्यप्रतीसह उपस्थित रहावे, असे आवाहन प्रवर अधीक्षकांनी केले आहे.

टपाल जीवन विमाकरिता थेट अभिकर्त्यांसाठी उमेदवारांचे वय  कमीत-कमी 18 वर्षे व जास्तीत-जास्त 50 वर्षे असावे. मान्यताप्राप्त केंद्रीय/राज्य सरकारच्या बोर्ड/ संस्थांमधून 10 वी उत्तीर्ण, आवेदनकर्त्याला विमा क्षेत्राबाबत तसेच विपणन कुशलता असणे आवश्यक, बेरोजगार/स्वयं रोजगार व्यक्ती, माजी जीवन विमा सल्लागार / कोणत्याही विमा कंपनीचे माजी अभिकर्ता, माजी सैनिक, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ कर्मचारी, निवृत्त शिक्षक, स्वयंसहाय्यता समूह पदाधिकारी इत्यादी टपाल जीवन विमा अभिकर्तासाठी आवेदन करू शकतात.

जो उमेदवार थेट अभिकर्तासाठी निवडला जाईल त्याला टपाल विभागाने वेळोवेळी ठरविलेले कमिशन प्रोत्साहन भत्ता दिला जाईल. थेट मुलाखतीव्दारे टपाल जीवन विमा / ग्रामीण टपाल जीवन विमाचे उमेदवार नियुक्त केले जातील. नियुक्त उमेदवारांना आंतरिक प्रशिक्षण देण्यात येईल. नियुक्त उमेदवारांना परवाना परीक्षेसाठी हजर रहावे लागेल आणि परवाना परीक्षा व प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच परवाना देण्यात येईल.

नियुक्त उमेदवारांना परवाना देण्याकरिता आणि परवाना परीक्षेसाठी वेळोवळी निर्धारित केलेली रक्कम, फी. फी म्हणून जमा करावे लागतील. निवड झालेल्या थेट अभिकर्त्याला रू. 5 हजार टपाल बचत बँक खात्यामध्ये अथवा राष्ट्रीय बचत पत्र /‍ किसान विकास पत्रमध्ये भारताच्या राष्ट्रपतींच्या नावे तारण म्हणून ठेवावे लागतील.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.